शिरागडला स्वयंपाक करत असतांना कुकर फुटले : 25 वर्षीय विवाहिता जखमी


यावल (19 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील शिरागड येथे घरात स्वयंपाक करत असतांना अचानक कुकर फुटल्यामुळे 25 वर्षीय विवाहिता गंभीर जखमी झाली. ही घटना शुक्रवारी घडली. महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

अचानक फुटला कुकर
शिरागड येथील रहिवासी शीतल किशोर सपकाळे (25) ही विवाहिता आपल्या घरात स्वयंपाक करत असताना रविवारी सकाळी स्वयंपाक करत असतांना अचानक कुकर फुटला व कुकरचे झाकण महिलेच्या डोक्यावर जोरात आढळले. यात महिलेच्या डोक्याला जबर दुखापत होऊन ती जमिनीवर कोसळली. तातडीने तिला यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. रुग्णालयात डॉ.तुषार सोनवणे, अधिपरिचारिका मंजुषा कोळेकर यांनी प्रथमोपचार केले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. महिलेची प्रकृती गंभीर आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !