केर्‍हाळे शिवारात शेतमजुराचा हृदयविकारामुळे मृत्यू


रावेर (23 ऑक्टोबर 2024) : रावेर तालुक्यातील केर्‍हाळे बु.॥ येथील एका तरुण शेतमजुराचा शेतातच हृदयविकारामुळे मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

केर्‍हाळे शेत-शिवारातील प्रतीक विजय पाटील यांच्या शेतात गोकुळ सुनील भील (22) हा शेतात काम करीत असताना चक्कर आल्यामुळे तो खाली कोसळला. त्यास त्वरित रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले. अर्जुन सुनील भील यांनी दिलेल्या खबरीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पेश आमोदकर करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !