अहिरवाडीत आजारास कंटाळून तरुणांची आत्महत्या


रावेर (23 ऑक्टोबर 2024) : रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

अहिरवाडी येथील मनोज रवींद्र चौधरी (35) यांनी आजाराला कंटाळून मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरात छताला बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत प्रमोद चौधरी यांनी रावेर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र राठोड करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !