चोरीची बुलेट ऐटीत मिरवणार्‍या सासर्‍यासह भुसावळातील जावयाला बेड्या : गुन्हे शाखेची कामगिरी


जळगाव (23 ऑक्टोबर 2024) : चार वर्षांपुर्वी चोरलेली दुचाकी सासर्‍याला विक्री करणार्‍या तन्वीर मजीद पटेल (रा.खडका रोड, पटेलगल्ली, भुसावळ) याच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. याप्रकरणी तन्वीरसह त्याचा सासरा अशपाक सत्तार पटेल (रा.अक्सानगर, मास्टर कॉलनी, जळगाव) यांच्याकडून चोरलेली बुलेट जप्त करीत त्यांनाही अटक करण्यात आली.

भुसावळातील संशयीत जाळ्यात
भुसावळातील मास्टर कॉलनीतील अशपाक सत्तार पटेल यांच्याकडे (एम.एच.19 ए.क्यू.7863) क्रमांकाची बुलेट असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संघपाल तायडे, हरीलाल पाटील, गणेश गव्हाणे, विजय पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने बुलेटच्या कागदपत्रांविषयी अशपाक पटेल यांच्याकडे विचारपूस केली असता, त्याने ही दुचाकी चार वर्षांपुर्वी त्यांचा जावई तन्वीर मजीद पटेल याने आणून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पथकाकडून तन्वीरचा शोध घेतला जात होता. तन्वीर हा (एम.एच.19 ए.टी.6690) क्रांकाच्या दुचाकीवरुन शहरात फिरत असतांना पथकाने त्याला दोन्ही दुचाकींविषयी चौकशी केल्यानंतर त्या भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

सासरे व जावई एलसीबीच्या कार्यालयात
तन्वीर याने त्याचा साथीदार आवेश बिसमिल्ला शेख (मणियार) (रा. खडका रोड) याच्या मदतीने चार वर्षांपूर्वी वाहन चोरल्याची कबुली दिली. त्यातील बुलेट ही तन्वीर याने त्याचे सासरे अशपाक पटेल यांना विक्री केली होती. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !