यावल शहरातील दोन गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार
Two criminals from Yaval city exiled for six months यावल (25 ऑक्टोबर 2024) : यावल शहरातील दोन उपद्रवींना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून आदेशाची अंमलबजावणी नुकतीच यावल पोलिसांनी केली. या कारवाईमुळे यावल शहरातील गुन्हेगारी गोटात प्रचंड खळबळ उडाली. कुणाल सतीश गजरे (23, सिद्धार्थ नगर, यावल) व गौरव सदानंद गजरे (22, सिद्धार्थ नगर, यावल) अशी हद्दपार संशयीतांची नावे आहेत.
यावल पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
यावल पोलीस निरीक्षक यावल प्रदीप ठाकूर संशयीतांच्या गुन्हेगारी कारवाया पाहता त्यांना हद्दपार करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. प्रस्तावाची पडताळणी झाल्यानंतर अधीक्षकांनी संशयीतांना सहा महिन्यांसाठी हद्दपार केले. कुणाल गजरे यास मुंबईतर तर गौरव गजरे यास कटवाडा अहमदाबाद, गुजरात येथे नातेवाईकांकडे सोडण्यात आले. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, एएसआय असलम खान, हेड कॉन्स्टेबल मराठे, सुनील पाटील, पोलीस नाईक वसीम तळवी, पोलीस कॉन्स्टेबल भरत कोळी, मोहन कोळी, सागर कोळी यांनी आदेशाची अंमलबजावणी केली.

