चारित्र्याच्या संशयावरुन भुसावळात पत्नीच्या डोक्यात कोयत्याचे वार


A coyote stabs his wife in the head due to suspicion of character भुसावळ (27 ऑक्टोबर 2024) : पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत पतीने पत्नीस मारहाण करीत घरातील लोखंडी कोयत्याने डोक्यावर मारहाण केल्याने पत्नी जखमी झाली. याप्रकरणी पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी पतीविरोधात गुन्हा
शहरातील झेडटीसी जवळील साळवे नगरातील रहिवासी महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजे दरम्यान घडली. पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत संशयीत पती सचिन किशोर बोराडे यांनी मारहाण केल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !