चॉकलेटच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार
मुक्ताईनगर (27 ऑक्टोबर 2024) : मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर चॉकलेटचे आमिष दाखवत अल्पवयीनाने अत्याचार केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अल्पवयीन संशयीताविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील सात वर्षीय पीडिता आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवार, 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.30 वाजता पीडिता घरी असताना संशयितासने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत जवळ बोलून तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान ही घटना पीडितेने आईला सांगितल्यानंतर पोलिसात धाव घेवून तक्रार नोंदवण्यात आली. शनिवार, 26 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे

