यावल शहरातील शिवाजी नगरात प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या


यावल (30 ऑक्टोबर 2024) : शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराजवळ असलेल्या शिवाजी नगरातील रहिवासी 48 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
शहरात श्री महर्षी व्यास मंदिराजवळील शिवाजीनगर भागातील रहिवासी मुरलीधर भाऊसिंग पवार (48) हे सोमवारी आपल्या राहत्या घरात असताना त्यांनी छताच्या कडीला काळ्या इलेक्ट्रिकल वायरच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीरक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित तडवी करीत आहे.


कॉपी करू नका.