भुसावळ विधानसभेच्या आखाड्यात प्रमुख मातब्बरांसह 16 उमेदवार वैध
माघारीनंतर चित्र होणार स्पष्ट : 12 नामनिर्देशन पत्र ठरले अवैध
भुसावळ (30 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीसाठी 22 उमेदवारांनी एकूण 33 अर्ज दाखल केले होते मात्र बुधवार, 30 रोजी छाननीत 21 नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून 12 नामनिर्देशन पत्र अवैध ठरल्याचे निवडणूक विभागाकडून कळवण्यात आले आहे तर नामनिर्देशनपत्र वैध ठरलेल्या उमेदवारांची संख्या 16 झाली आहे.
सहा उमेदवारांचे अर्ज अवैध
दरम्यान, रजनी संजय सावकारे, उज्वला गजानन चंदनकार, प्रीती तोरण महाजन, किर्ती सुरेश वानखेडे, सुरेश वामन केदारे, अनुपकुमार प्रेमचंद मनुरे
यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले आहे. दरम्यान, प्रीती महाजन यांचे पती तोरण महाजन यांनी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगितले.