सातपुड्यात अवैध वृक्षतोड करताना दोन दुचाकींसह 63 हजारांचा मुद्देमाल जप्त


रावेर (31 ऑक्टोबर 2024) : अहिरवाडी वन परिमंडळात अवैध वृक्षतोड करणार्‍यांवर वन विभागाने कारवाई करीत त्यांच्याकडील लाकडासह दोन दुचाकी मिळून 63 हजार 111 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने अवैधरित्या लाकडाची तस्करी करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. बुधवार, 30 रोजी रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना गुप्त मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. वनक्षेत्रातील अहिरवाडी परिमंडळातील पाडले खुर्द वन विभागाने गस्त सुरू केल्याने काही संशयीत अवैधरित्या वृक्षतोड करीत असल्याने पथकाने त्यांचा पाठलाग केल्यानंतर संशयीत लाकूड व दुचाकी सोडून पसार झाले.

63 हजारांचा मुद्देमाल जप्त
संशयीताच्या वृक्ष तोड केल्याने तीन हजार 111 रुपये किंमतीचे धावडा खुंट लाकूड तसेच 60 हजार रुपये किंमतीच्या विना क्रमांकाच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई धुळे वनसंरक्षक निनु सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक कॅम्प समाधान पाटील, वनक्षेत्रपाल अजय बावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अहिरवाडी, वनरक्षक पाडले खुर्द व राऊंड स्टॉफ तसेच वनमजुरांनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !