बसच्या चाकाखाली बकरीचे पिल्लू आल्याच्या रागातून बस चालकाला मारहाण
यावल (26 नोव्हेंबर 2024) : यावल तालुक्यातील कोळवद गावातील बस स्थानकाजवळ बसच्या चाकाखाली बकरीचे पिल्लू आल्याच्या रागातून बस चालकाला गावातीलच एकाने शिवीगाळ करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे मारहाण प्रकरण
कोळवद, ता.यावल गावातील बसस्थानकाजवळून बस घेऊन वसंत उघडू नन्नवरे हे जात असताना बसच्या चाकाखाली बकरीचे पिल्लू आले. बसखाली पिल्लू आल्याच्या रागातून कोळवद गावातील सिराज बिस्मिल्ला तडवी याने बस चालक नन्नवरे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सिराज तडवी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.

