अट्रावलला कापणी योग्य सहा लाखांची केळी अज्ञात माथेफिरूने कापली

यावल पोलिसात गुन्हा दाखल : गेल्या चार वर्षात चौथी घटना ; शेतकर्‍यांमधून संताप


An unknown miscreant cut a banana worth six lakhs that was ready for harvesting in Atraval यावल (1 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील अट्रावल या गावातील शेतकर्‍याच्या राजोरा रस्त्यावरील शेतात कुणीतरी अज्ञात माथेफिने प्रवेश करीत कापणी योग्य झालेल्या केळी घडांचे नुकसान केले. उभ्या घडावर कोयत्याच्या माध्यमातून केळी कापून फेकण्यात आली. यात एक हजार 800 केळीचे खोड कापून फेकले. यामध्ये शेतकर्‍याचे तब्बल पाच लाख 94 हजारांचे नुकसान झाले. गेल्या चार वर्षात अट्रावल गावातील ही चौथी घटना असून शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
अट्रावल, ता.यावल या गावातील शेतकरी मयूर सुरेश वारके यांनी आपल्या अट्रावल शिवारातील राजोरा रस्त्यावर असलेल्या शेत गट क्रमांक 483 मध्ये केळी पिकाची लागवड केली होती. येथे त्यांनी तब्बल चार हजार 800 केळी खोडांची लागवड केली आहे व आता केळी कापणी योग्य झाली तर त्यातील 230 खोड केळी त्यांनी कापणी केली होती. ज्याला एक हजार 400 रुपये क्विंटलचा भाव मिळाला होता तर उर्वरित एक हजार 800 केळीचे खोड हे कापणी योग्य झाले होते व येत्या दोन दिवसात ती कापणी होणार होती मात्र तत्पूर्वीच शुक्रवारी मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात माथेफिरूने शेतात प्रवेश केला आणि कोयत्याच्या साह्याने केळी घड वर सतत वार करून केळीची नासधूस करून तब्बल पाच लाख 94 हजार रुपयांचे नुकसान केले. हा प्रकार शनिवारी सकाळी निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात मयूर वारके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !