भालशीव सरपंचांची दुचाकी अडवून लूट : दोघा आरोपींना तीन दिवसांची कोठडी


Bhalshiv Sarpanch’s bike stolen by intercepting it : Two accused remanded in custody for three days यावल (1 डिसेंबर 2024) : किनगाव-यावल रस्त्यावर दुचाकीव्दारे मागून येवून लाथ मारून दुसर्‍या समोरील दुचाकी चालकास अडवून दहा हजारांची रोकड व मोबाईल दोन अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. ही घटना 16 नोव्हेंबर रोजी रात्री घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयीतांना पोलिसांनी अटक करीत त्यांची ओळख परेड केली व शनिवारी दोघांना यावल न्यायालयात हजर केले असता दोघांना 2 डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे लूट प्रकरण
भालशीव-पिंप्री, ता.यावल येथील सरपंच मोहन एकनाथ सपकाळे व शिवलाल भगवान सपकाळे हे चोपडा येथून 16 नोंव्हेंबर रोजी रात्री यावलकडे येत होते. दरम्यान, किनगावजवळ त्यांच्या दुचाकी (क्रमांक एम.एच.19 बी.एल.0051) ला मागून येणार्‍या दुचाकी (क्रमांक एम.एच.28 ए.डब्ल्यू.238) वरील इसमाने लाथ मारली व त्यांना थांबवून हत्याराचा धाक दाखवून ‘तुम्हारे पास के सारे पैसे मुझे दे दो, नही तो मै तुम्हे मार डालुंगा’ अशी धमकी देत मोबाईल व 10 हजाराची रोकड लांबवली.

अटकेतील दोघे जिल्हा कारागृहात
यावल पोलिसात गुन्हा दाखल करीत पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, परमेश्वर जाधाव यांनी दुचाकीच्या क्रमांकावरून मूळ मालकाचा शोध घेतला. सीसीटीव्ही फुटेज तपासले व या गुन्ह्यातील संशयीत फरहान शेख फारूख अहेमद (24, रा.मिर्झानगर इकबाल चौक, बुलढाणा), शेख राजीक शेख इसरार (22, रा.डांगपूरा, यावल) या दोघांना अटक केली व या दोघांची ओळख परेड पार पडल्यानंतर दोघांना जिल्हा कारागृहातून ताब्यात घेत शनिवारी यावल येथील न्यायालयात प्रथमवर्ग न्या.आर.एस.जगताप यांच्यासमोर हजर केले असता दोघांना 2 डिसेंबरपर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोघांना जिल्हा कारागृहात हलवण्यात आले. तपास पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार परमेश्वर जाधव करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !