यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले : दोघांना अटक


A minor girl was lured and abducted from Yaval taluka : Two arrested यावल (3 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले होते. याप्रकरणी 30 नोव्हेंबर रोजी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यावल पोलिसांनी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील फर्दापुर येथून दोन तरुणांना अटक केली आहे. दोघांना भुसावळ येथील विशेष न्यायालयात हजर केले असता दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली.

असे आहे प्रकरण
यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने, काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाकडून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, पोलीस नाईक किशोर परदेशी, अनिल पाटील या पथकाने केला. अल्पवयीन मुलीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फर्दापुर येथून ताब्यात घेतले व तिच्या कुटुंबाला सोपवले आणि तिला फुस लावून पळवून नेणार्‍या पवन संतोष ढवले (18) व केदार संतोष पवार (18, दोन्ही रा.फर्दापूर, जि.छत्रपती संभाजी नगर) यांना अटक केली.

दोघांना सोमवारी भुसावळ येथील विशेष बाल न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !