संघर्षच जिंकण्याची वाट तयार करतो !
चाळीसगावला सामान्यज्ञान स्पर्धेचा शुभारंभ : आ.मंगेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद
चाळीसगाव (13 डिसेंबर 2024) : परिस्थितीची जाण असणारेचं इतिहास घडवतात. अभ्यासासोबतचं आपल्या आजूबाजुला घडणा-या गोष्टींची माहिती ठेवली पाहिजे. आ.बं. विद्यालयात यासाठी स्पर्धा होते. ही खरोखरचं उल्लेखनीय बाब आहे. लक्षात ठेवा, संघर्षचं जिंकण्याची वाट तयार करत असतो. आपण फक्त जिद्दीने पावले पुढे टाकत जायचं. अशा संवाद आ. मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव एज्युकेश सोसायटीच्या आ. बं. मुलांच्या विद्यालयात साधला.
शुक्रवारी विद्यालयात स्व. मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल स्मृतिकरंडक आंतरशालेय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्यासह पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आ. चव्हाण बोलत होते. यावेळी विचारपिठावर यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष योगेश अग्रवाल, संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचिव डॉ. विनोद कोतकर, सहसचिव डॉ. मिलिंद बिल्दिकर, मु, रा, अमृतकार, सुरेश स्वार, अॕड. प्रदीप अहिरराव, अशोक बागड, भोजराज पुंशी, जितेंद्र वाणी, निलेश छोरिया, योगेश करंकाळ, उपप्राचार्य डॉ. अजय काटे, रवींद्र राजपूत, सुलोचना इंगळे, शबनम शेख, मंजुषा नानकर, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक बा.बा. सोनवणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय मनोहर सूर्यवंशी यांनी केले. किरणकुमार कबाडी यांनी मनोगतातून सांगितले की, शालेय स्तरावरील स्पर्धा ह्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. तयारी, सातत्य यामुळे स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळते. अध्यक्षीय भाषणात रामकृष्ण पाटील यांनी मनोगतात सांगितले की, स्पर्धेतूनच अधिकारी तयार होतात. स्पर्धा जीवनाला दिशा देतात. माणसाला सतत कार्यप्रणव ठेवतात.
सुत्रसंचलन श्वेता सोमाणी यांनी तर आभार पर्यवेक्षक महेंद्र कुमावत यांनी मानले. यास्पर्धेत महाराष्ट्रभरातून ३४ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे हे १७ वे वर्ष असून शनिवारी १४ रोजी या स्पर्धेचा समारोप होईल.
