परभणीत संविधानाची विटंबना : मुक्ताईनगरात घटनेचा निषेध करीत तहसीलदारांना निवेदन


मुक्ताईनगर (14 डिसेंबर 2024) : परभणी येथे समाजकंटक देशद्रोही युवकाने भारतीय संविधानाची विटंबना केल्याने त्याच्यावर देशद्रोहाचा (मोक्का) लावून गुन्हा नोंद करण्याची मागणी मुक्ताईनगर येथे बौद्ध समाज बांधवासह जागृक नागरिकांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली.

परभणीत संविधानाची विटंबना
10 डिसेंबर रोजी परभणी येथे देशद्रोही असलेल्या एका इसमाने काही माथेफिरूंच्या सांगण्यावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली आहे. संशयीताने हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले याचा तपास करावा व या घटनेचा मुक्ताईनगर येथील बौद्ध बांधवांनी तीव्र शब्दात निषेध केला. याबाबत सखोल तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भीमसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर विविध संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, भीमसैनिक सुधाकर बोदडे, जयपाल बोदडे, मोहन मेढे, रवींद्र बोदडे, अनिल बोदडे, गणेश मोरे, विश्वनाथ गणेश, विजय तायडे, कुणाल गवयी, निखील बोदडे, सचिन झनके, अमोल बोदडे, नाना बोदडे, रमेश बोदडे, विजय बोदडे, प्रमोद सौंदळे आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !