जळगावात अवैध गॅस रिफिलिंग सेंटररचा सुळसुळाट : एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत 34 सिलिंडर जप्त
जळगाव (15 डिसेंबर 2024) : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरचा शहरात सुळसुळाट वाढला आहे. शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ वाहनात अवैध गॅस भरताना झालेल्या स्फोटात सात जणांचा मृत्यू ओढवल्यानंतर पोलिस प्रशासन खळबडून जागे झाले आहे. एमआयडीसी पोलिसांनी एका घरातच सुरू असलेल्या व्यवसायावर छापेमारी करत 20 घरगुती आणि 14 व्यावसायीक गॅस सिलेंडर जप्त केले.
शहरात सर्रासपणे अवैधरित्या रिफिलिंग
जळगावमध्ये घरगुती व व्यावसायीक सिलेंडरचा अवैध वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासाठी सिलेंडरचे ब्लॅक मार्केट चालविणारे रॅकेट देखील आहे. दरम्यान कारमध्ये घरगुती गॅसचा अवैधपणे भरणा करून देणारे काही ठिकाण जळगाव शहरात तयार झाले आहेत. यातच जळगाव शहराच्या इच्छादेवी चौफुलीजवळ कारमध्ये गॅस भरणा करत असताना झालेल्या स्फोटामुळे अवैध गॅस वापराचा मुद्दा समोर आला आहे.
यानंतर पोलिसांनी अवैध गॅस वापर करण्यावर करडी नजर आहे. अशातच जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. भरवस्तीत घरातच सुरू असलेला कारखाना उध्वस्त करीत पोलिसांनी 34 व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील फातेमा नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने सापळा रचून छापा टाकला असता शफी याला ताब्यात घेतले. घराची झडती घेतली असता हॉल, किचन, शौचालयातून 20 घरगुती आणि 14 व्यावसाि.यीयक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत.