तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक जळगावात!
राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते उद्घाटन
जळगाव (16 डिसेंबर 2024) : जळगाव जिल्हा कारागृहमध्ये तृतीयपंथीय बंद्याकरीता उत्तर महाराष्ट्रातील पहिले बॅरेक बांधण्यात आल असून त्याचे उद्घाटन राज्याचे करागृह विशेष महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
पुरूष बंद्यासाठी नवीन बॅरेक
जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-2 मध्ये पुरुष बंद्याकरीता दोन नवीन बॅरेक बांधण्यात आले असून कारागृहाची बंदी क्षमता 200 इतकी आहे मात्र प्रत्यक्षात त्यात 524 बंदी बंदिस्त आहेत. नवीन बॅरेकच्या बांधकामामुळे कारागृहामध्ये 60 बंदी सामावून घेईल इतकी नवीन वाढीव क्षमता निर्माण झाली आहे. बॅरेक बांधकामाचे उद्घाटनन कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याहस्ते करण्यात आले.
कामांची केली पाहणी
कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेकरीता चार वॉच टॉवर, मुख्य प्रवेशव्दार, स्वयपांकगृह रंगरगोटीची कामे प्रगतीपथावर असल्याने डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कामाची पाहाणी करून कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सुचना दिल्या.
बॅरेक बांधकाम उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जळगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, वरिष्ठ तुरुंगाधिकारी गजानन विठ्ठल पाटील व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.