बोदवड न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत : 218 प्रकरणात तडजोड

नऊ मंत्री बारावीपर्यंत तर दोघे अवघे दहावी पास


बोदवड : (16 डिसेंबर 2024) : शहरताील दिवाणी व फौजदारी न्यायालयात 14 रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय लोक अदालत झाली. नागरिकांनी आपली प्रलंबित प्रकरणे यामध्ये दाखल करून तडजोडीतून न्याय मिळवला व पुन्हा नव्याने तुटलेले संसार व दुभंगलेली मने पुन्हा जोडण्याचे काम लोकअदालतीने केले, असे प्रतिपादन अ‍ॅड.अर्जुन टी. ाटील यांनी केले. दरम्यान, लोकअदालतील 218 प्रकरणात तडजोड होवून सहा लाख 16 हजार 149 रुपयांची वसुली झाली.

प्रलंबित प्रकरणांचा निपटारा
दिवाणी, तडतोडपात्र, फौजदारी, मोटार अपघात, नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, भूसंपादन, बँका, वित्तीय संस्था तसेच शासकीय आस्थापनांची थकीत वसुली अशा दाखलपुर्व प्रकरणांसह प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. लोकअदालतीत ज्या जोडप्यांमध्ये समजोता झाला त्यांचा गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी न्या.क्यु.ए.एन.सरवरी होते. मंचावर बोदवड तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अर्जुन टी.पाटील, सचिव अ‍ॅड.धनराज सी.प्रजापती, अ‍ॅड.किशोर महाजन, अ‍ॅड.के.एस.इंगळे, पंच अ‍ॅड.सी.के.पाटील, अ‍ॅड.अमोलसिंग पाटील होते. वकील संघाकडुन तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे मॅनेजर, सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक राहुल पाटील, विभागीय अधिकारी योगेश तायडे, जयेश गंगवार, वीज महामंडळ, महसूल विभाग अधिकारी, विधी प्राधिकरणाचे योगेश पाटील, अविनाश राठोड उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड.के.एस.इंगळे यांनी केले.


कॉपी करू नका.