तोतया महिलेला उभे करीत बिनशेती प्लॉटची परस्पर विक्री : पाचोर्‍यात साक्षीदारांना बेड्या

पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार


Mutual sale of uncultivated plot by posing as an impersonator: Witnesses handcuffed in Pachora पाचोरा (20 डिसेंबर 2024) : नावातील साधर्म्याचा गैरफायदा घेत महिलेने बनावट कागदपत्रे सादर करून पाचोरा दुय्यम निबंधक कार्यालयात बिनशेती प्लॉटची परस्पर विक्री करत खरेदी खत नोंदवले. ही घटना उघडकीस आल्यानंतर दोन साक्षीदार पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून बनावट महिलेचा शोध घेतला जात आहे. .

काय आहे प्रकरण ?
पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नावाचे साधर्म्य असलेल्या बनावट महिलेने गट नंबर 134 च्या 2 मधील प्लॉट नंबर 9 क्षेत्रफळ 180 चौरस मीटर हा शीतल सुनीलकुमार पाटील यांच्या मालकीचा प्लॉट नागराज गोविंदा अहिरे यांना विक्री केला.व दुय्यम निबंधक एस. एस. भास्कर यांची दिशाभूल करीत या बनावट महिलेने दि. 7 रोजी दस्त नोंदणी केली. आपण शीतल सुनीलकुमार पाटील असल्याचे भासवून या बनावट महिलेने हा प्लॉट दलाल करवी नागराज यांना विक्री केला.दरम्यान, काही महिन्यांनी शीतल पाटील यांनी उतारा काढला असता त्यांच्या ही धक्कादायक बाब लक्षात आली.

दस्त नोंदणीचा अर्ज अन् दाखल झाला गुन्हा
हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच शीतल सुनीलकुमार यांनी दस्त नोंदणी रद्द करण्याचा अर्ज केला. त्यानंतर निबंधकांनी पाचोरा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार या प्रकरणी साक्षीदार असलेले पुंडलिक काशीनाथ पाटील (रा.जारगाव), अक्षय आधार बडगुजर (रा.लोहारी) हे पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. बनावट महिलेचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !