जळगावातील मविआतील चोरी प्रकरण : अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन


जळगाव (21 डिसेंबर 2024) : मराठा विद्याप्रसारक संस्थेतील कागदपत्र चोरीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना न्यायालयाने अटी शर्तीवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
19 जुलै 2021 रोजी मराठा विद्याप्रसारक संस्थेत बेकायदा घुसून दस्तऐवज चोरी करण्याच्या आरोपात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. अ‍ॅड. विजय पाटील यांना अटक करण्यात आली . त्यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, परंतु तपासी अधिकार्‍यांनी गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे सांगून 23 डिसेंबरपर्यंतची मुदत मागितली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची मुदतवाढ देऊन शुक्रवारी जामीन अर्जावर म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर बुधवारी युक्तिवाद झाला होता. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी चौकशीला बोलावले तेव्हा हजर राहावे लागेल, या अटीवर त्यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. अ‍ॅड.गोपाळ जळमकर यांनी त्यांच्याकडून काम पाहिले.


कॉपी करू नका.