जळगाव मनपाचा नगररचना सहाय्यक मनोज वन्नेरे निलंबित
जळगाव (21 डिसेंबर 2024) : महानगरपालिकेच्या नगररचना विभागातील मनोज वन्नेरेला निलंबित करण्यात आला आहे याबाबतचे आदेश महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी काढले.
अहवाल येताच कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अहवाल प्राप्त होताच ही कारवाई करण्यात आली. नगररचना विभागात पिंप्राळा शिवाराची जबाबदारी असलेले रचना सहायक मनोज वन्नेरे यांना 9 डिसेंबर रोजी बांधकाम परवानगीसाठी 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. महापालिका आयुक्त व नगररचना विभागाचे सहायक संचालकांसाठी पैसे घेतल्याचे तक्रारीत म्हटले होते. वन्नेरेला अटक करण्यात आली होती. त्याला 12 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी वन्नेरे याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.