अट्रावलला अज्ञात माथेफिरूने केळीचे घड कापले : शेतकर्याचे चार लाखांचे नुकसान
यावल (23 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील अट्रावल या गावातील शेत शिवारात शेत गट क्रमांक 301 मध्ये अज्ञात माथेफिरूने कापणी योग्य केळीचे घड कापून फेकले. 2 हजार 200 केळीचे घडांची नासधुक करीत शेतकर्यांचे सुमारे चार लाखाचे नुकसान केले आहे. ही घटना दिनांक रविवारी निदर्शनास आली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथेफिरु विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके ?
अट्रावल ता. यावल या गावात टिनेश नितीनत महाजन हे शेतकरी राहतात. त्यांचे अट्रावल शिवारात शेत गट क्रमांक 301 मध्ये त्यांनी केळीची लागवड केली होती. कापणीयोग्य झालेली ही केळी होती. दरम्यान या त्यांच्या शेतात कोणीतरी अज्ञात माथेफिरूने शनीवारी मध्यरात्री नंतर जाऊन शेतातील 2 हजार 200 कापणी योग्य झालेले केळीचे घड कापून फेकून दिले. विशेष म्हणजे केळं अर्धे कापले व नासधुस केले. यामध्ये शेतकर्याचे तब्बल चार लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात शेतकरी टिनेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथेफिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.