अल्पवयीन तरुणीवर भावी पतीकडून अत्याचार


धरणगाव (23 डिसेंबर 2024) : आत्याच्या मुलाशी लग्न निश्चिती झाल्यानंतर तरुणाने अल्पवयीन 16 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. धरणगाव तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. या संदर्भात रविवार, 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
धरणगाव तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून जामनेर तालुक्यात राहणारा तिच्या चुलत आत्याचा मुलगा याच्याशी लग्न ठरलेले आहे. मुलगी 18 वर्षाची होईल त्यानंतर त्यांचे लग्न केले जाईल, असे ठरलेले होते त्यामुळे त्यांच्यात फोनवरून बोलणे सुरू होते. ऑगस्ट 2024 मध्ये पीडित मुलीचा चुलत आत्याचा मुलगा म्हणजेच भावी पती हा तिला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याने घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरीने अत्याचार केला.

धरणगाव पोलिसात गुन्हा
दरम्यान, हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह पीडित मुलीने धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अत्याचार करणार्‍या संशयित आरोपीवर रविवार, 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार करीत आहे.


कॉपी करू नका.