प्रवाशांना दिलासा : नाशिक-धनबाद, रिवा ते मडगाव दरम्यान हिवाळी सुट्यांमध्ये विशेष रेल्वेगाड्या धावणार !
भुसावळ (24 डिसेंबर 2024) : नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नाशिक ते धनबाद आणि रिवा ते मडगाव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना जळगाव, भुसावळ थांबा असणार आहे.
2 जानेवारीपर्यंत धावणार गाडी
रेल्वे क्रमांक 03398 गरीबरथ विशेष ही 22 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी नाशिक येथून 8.55 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी धनबाद येथे रात्री 9 वाजता पोहोचेल. रेल्वे क्र. 03397 गरीबरथ 20 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार रोजी धनबाद येथून रात्री 11 वाजता सुटेल. तिसर्या दिवशी ती नाशिक येथे सकाळी 7 वाजता पोहोचेल.

गोव्यासाठी रिवा-मडगाव गोवा जाण्यासाठी आता आणखी एक विशेष रेल्वे धावणार आहे. 01703 ही विशेष रेल्वे 22 डिसेंबर आणि 29 डिसेंबर रोजी रिवा येथून दुपारी 12 वाजता सुटेल. दुसर्या दिवशी मडगाव येथे रात्री साडेनऊ वाजता पोहोचेल. 01704 विशेष रेल्वे 23 डिसेंबर व 30 डिसेंबर रोजी मडगाव येथून रात्री 10.30 वाजता सुटेल.









