भुसावळातील आतीश खरातवर चाकूने प्राणघातक हल्ला
भुसावळ (28 डिसेंबर 2024) : शहरातील समता नगरातील रहिवासी आतीश खरात याच्यावर शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेत आतिशला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शहर पोलिसांची धाव
चाकू हल्ल्याची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे या भागात घबराटीचे वातावरण आहे. जखमी आतिशला येथील ट्रामा केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल केले होते मात्र तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले तर जुन्या वादामधून हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.










