बोगस शालार्थ आयडी प्रकरण ; जळगाव माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांसह 48 जणांना एसआयटीने बजावल्या नोटीसा

812 कर्मचार्‍यांच्या शालार्थ आयडीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली : आजपासून तीन दिवस नाशिकला सुनावणी


Bogus Shalarth ID Scam : SIT Issues Notices to 48 Individuals, Including Jalgaon’s Secondary Education Officer जळगाव (15 एप्रिल 2026) : बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने कारवाईचा जोर अधिक वाढवला असून आता जळगावच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह तत्कालीन 11 शिक्षणाधिकार्‍यांसह एकूण 48 जणांना एसआयटीने नोटीसा बजावल्याने शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता 15 ते 18 एप्रिल दरम्यान नाशिक विभागीय मंडव्याच्या कार्यालयात सुनावणी होत असून याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

बोगस आयडीद्वारे लाटला कोट्यवधींचा पगार
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यभरात बनावट कागदपत्रांच्या आधारे 600हून अधिक शिक्षकांचे बोगस आयडी तयार करण्यात आले व शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा पगार संबंधितांनी लाटला आहे. 2013 ते 2026 या काळात नाशिक विभागातील खाजगी व प्राथमिक, माध्यमिक शाळेतील सुमारे 812 कर्मचार्‍यांच्या आयडीत अनियमितता आढळली आहे.

जळगाव जिल्ह्यात 48 जणांना नोटीसा
बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी एसआयटीने ज्या 48 जणांना नोटीस बजावली आहे, त्यात सध्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह आर.डी. विसपुते, एस.बी.हिंगोणेकर, एस.टी. बराडे, डी.पी.महाजन, बी.जे.पाटील, बी.एस.अकलाडे, डॉ.नितीन बच्छाव, सचिन परदेशी, डॉ. किरण कुंवर, डॉ.एम.व्ही. कदम यांच्यासह 11 उपशिक्षणाधिकारी, तीन कक्षाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सहायक अशा एकूण 48 कर्मचार्‍यांना आता नाशिकला होणार्‍या सुनावणीसाठी सामोरे जावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !