देशभरात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारी टोळी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात : जळगावातील दोन गुन्ह्यांची उकल


Gang Wreaking Havoc Nationwide by Breaking into ATMs Caught in Jalgaon Crime Branch’s Net: Two Crimes in Jalgaon Solved जळगाव (15 एप्रिल 2026) : देशभरात एटीएम फोडून पोलिसांना जेरीस आणणार्‍या टोळीला जळगावच्या गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर जळगावातील दोन एटीएम मशीन लांबवण्याचे गुन्हे उघडकीस आले असून अन्य गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि अन्य मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जळगावातून लाखोंची रोकड असलेले लांबवले एटीएम
जळगावच्या पोलन पेठ परिसरातील सत्यम प्लाझा कॉम्प्लेक्स येथील इक्वीटस स्मॉल बँकेचे -एटीएम चोरट्यांनी वाहनात टाकून अलगद लांबवले होते. ही चोरी झाल्यानंतर 3 एप्रिल 2026 रोजी बँकेचे व्यवसाय ब्रँच मॅनेजर हरीष विजय गांधी (37) यांनी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता.

पुन्हा आरोपी चोरीसाठी येताच आवळल्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना काही संशयीत जळगावात पुन्हा एटीएम चोरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह सापळा रचला. मंगळवार, 14 एप्रिल 2026 रोजी मन्यारखेडा रोडवरुन संशयीत मोबीन आत्मज मिला (28, रा.बेगी नाजर, ता.नकुर, जि.सर्‍हानपूर, उत्तर प्रदेश) व अब्दुल करीम नुर हसन (52, रा.तितरोद, ता.नकुर, जि.सर्‍हानपूर, उत्तर प्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले.

61 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून 50 हजार रुपये किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल, 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन, 700 रुपयांची रोकड तसेच दोन हेल्मेट मिळून 61 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी त्यांच्या इतर तीन साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. एटीएम चोरी करण्यासाठी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीतून महिंद्रा पिकअप गाडी चोरी करून तिचा वापर केल्याचेही त्यांनी सांगितले

देशभरात आरोपींचा धुमाकूळ
अटकेतील आरोपींनी देशभरात विविध ठिकाणी एटीएम चोरीचे गुन्हे केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आरोपींनी जळगावच्या शनीपेठ तसेच जळगाव शहर हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्या सोबतच झारखंड व यवत पुणे ग्रामीण महाराष्ट्र हद्दीत तीन गुन्ह्यांची कबुली दिली आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !