रसलपूरला मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन : तीन वाहनांवर कारवाई


Violation of rules during procession to Rasalpur : Action taken against three vehicles रावेर (29 डिसेंबर 2024) : रावेर तालुक्यातील रसलपूर येथे हजरत दिवाण गयासोद्दीन अलीबाबा दर्गा उरुसानिमित्ताने काढण्यात आलेल्या संदल मिरवणुकीत नियमाचे उल्लघंन केल्याने दोन बॅण्ड पथक वाहन आणि एका डी.जे.वाहनावर रावेर पोलिसांनी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके ?
रसलपूर येथे हजरत दिवाण गयासोद्दीन अलीबाबा दर्गा उरुसानिमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसाठी परवानगीमध्ये दिलेल्या अटी व शर्तीचे उलंघन करण्यात आल्याने हबीब ब्रास बँड (अमळनेर) यांच्या वाहन (क्र.एम.एच.04 एच.एस. 0182), आर.के.बँड (धुळे) वाहन (क्र.एम.एच. 43 एडी. 1579) या बॅन्ड पथकांच्या दोन वाहनांवर तसेच धुळे येथील डी.जे. साउंण्ड सिस्टीमच्या एका वाहनावर रावेर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिली.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !