भारनियमनात तूट भरून निघणार : भुसावळातील 660 मेगावॅट प्रकल्प आठवडाभरात सुरू होणार !
660 MW project in Bhusawal to start within a week! भुसावळ (1 जानेवारी 2025) : सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प कार्यान्विती करणापूर्वीच तांत्रिक दोषात अडकला मात्र तो आठवडाभरात कार्यान्वीत होण्याची शक्यता आहे. महानिर्मितीच्या तब्बल चार हजार 550 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला दीपनगरातील 660 मेगावॅट
प्रकल्प लवकरच कार्यान्वीत होण्याची आशा आहे. तसे झाल्यास भारनियमनाच्या काळात तूट भरून काढण्यासाठी राज्याला खासगी, सेंट्रल ग्रीडवरून वीज घेण्याची गरज कमी भासणार आहे.

2018 मध्ये भूमिपूजन
या प्रकल्पाचे भूमिपूजन मार्च 2018 मध्ये झाले होते. येथे 660 मेगावॅट प्रकल्पाची ऑइल इंधनाचा वापर करुन सिंक्रोनायझेशन ही प्रक्रिया सुरू होणार आहे. यानंतर मुख्य इंधन असलेल्या कोळशाचा वापर करुन वीज निर्मिती होईल. वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी सिंक्रोनायझेशन ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या प्रक्रियेत काही प्रमाणात वीजि नर्मिती केली जाणार असून ती ग्रीडला पुरवठा होईपर्यंतच्या सर्व यंत्रणेची चाचणी घेतली जाणार आहे. या आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही प्रक्रिया सुरळीत झाली व संचात इतर काही दोष आढळून आले नाहीत तर मार्च 2025 पर्यंत या प्रकल्पातून व्यावसायीक तत्वावर वीज निर्मिती होईल.









