मोठी बातमी : छत्तीसगडमध्ये 12 नक्षली ठार
विजापूर (9 फेब्रुवारी 2025) : विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात जवानांनी तब्बल 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेत तीन ते चार सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
बस्तरचे आयजी सुंदरराज पी.यांनी या चकमकीची पुष्टी केली आहे. सुंदरराज पी म्हणाले की, माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली होती, त्यानंतर घटनास्थळी सैन्य पाठवण्यात आले. रविवारी सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. बिजापूर डीआरजी, एसटीएफ आणि बस्तर फायटर्सच्या सैनिकांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे.










