पोक्सो कायद्यान्वये भुसावळातील 28 वर्षीय आरोपीला अटक

अल्पवयीन मुलीशी संबंधित गुन्ह्यात तपासादरम्यान वाढवली गंभीर कलमे ; बाजारपेठ पोलिसांची कारवाई


भुसावळ (शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2026) : भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित दाखल गुन्ह्यात तपासादरम्यान लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) तसेच भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमे वाढविण्यात आल्यानंतर पोलिसांनी शेख अशपाक शेख मुस्ताक (28, रा. फकीरवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) याला अटक केली.

काय आहे प्रकरण ?
बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 467/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 64(2)(एम) तसेच पोक्सो कायदा 2012 मधील कलम 4, 5(एल) आणि 6 वाढविण्यात आली.

बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या शोधपथकाने कारवाई सुरू केली. शोधादरम्यान आरोपी मिळून आल्यानंतर तपासात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे आणि पोलीस अंमलदार जितेंद्र वितकर करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !