किशोरी पेडणेकरांचा नीलम गोर्हेंवर निशाणा ; म्हणाल्या ही बाई तर….!

मुंबई (24 फेबु्रवारी 2025) : शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या नीलम गोर्हे यांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरे गट संतप्त झाला आहे. त्यातच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही नालायक बाई असे म्हणत नीलम गोर्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आजपर्यंत महापौरपर्यंत गेलो पण आमचा पेढाही उद्धव ठाकरे यांनी घेतला नाही, ही बाई पिऊन बसली होती का? या बाईला साहित्यिक परिषदेत कोणी भांडायला लावले? कोणाची सुपारी घेतली?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. ती माझी सहकारी कधीच नव्हती. नाव गोर्हे असले तरी काम काळे आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
स्वतःला हुशार समजणारी ही बाई काय वेळ न बघता बरळल्याचा हल्लाबोल पेडणेकर यांनी केला. पेडणेकर पुढे म्हणाल्या की तीन वेळा आमदार दोन वेळा उपसभापती झालेल्या या बाईने किती मर्सिडीज दिल्या आणि कोणाला दिल्या हे सांगावे. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला गेला तर साहित्यिकांच्या कार्यक्रमाला गेला. समाजाला दिशा देणारी माणसे म्हणजे साहित्यिक असतात. मात्र, बाई जाऊन बरळल्याचे पेडणेकर म्हणाल्या. या नालायक बाईला काय म्हणायचे आहे, असा हल्लाबोल किशोरी पेडणेकर यांनी केला.
एक नंबरची खोटारडी बाई
किशोरी म्हणाल्या, मुळात एक नंबरची ही खोटारडी बाई आहे. शिव्या घालायच्या लायकीची नाही. सतत मातोश्रीवर बसलेली असायची आणि सतत बोलायची थांबावे लागेल, तू होतीस कोण आणि तू करतेस काय? महिला आघाडी वाढवण्यासाठी कधीच काही केले नाही. पेडणेकर म्हणाल्या की, मी एका कार्यक्रमासाठी बोलावले तर माझ्याकडे साडी मागितली. मी दिली तर मला ती परत केली. मला ही साडी पाहिजे, अशी साडी पाहिजे असे सगळे होते. बाळासाहेब साहित्यिकांना मान द्यायचे, तीच धुरा उद्धव साहेबांनी वाढवण्याचे काम केल्याचे पेडणेकर म्हणाल्या.
