भुसावळच्या युवकाचा जळगावात अपघाती मृत्यू
भरधाव ट्रकने दिली धडक ; हनुमान नगरात शोककळा
जळगाव : भुसावळातील सिंधी कॉलनी परीसरातील हनुमान नगरातील सौरभ गोपालदास मनवाणी (19) हा युवक मित्रासोबत दुचाकीने घरी येत असताना भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी साडेचार वाजता आहुजा नगरात हा अपघात झाला. मयत सौरभ हा बांभोरी येथील एसएसबीटी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींगच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. दुपारी महाविद्यालयातून मित्रासोबत सौरभ दुचाकीवरून घराकडे येत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकचा फटका बसल्याने सौरभ ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा मृत्यू ओढवला. अपघातानंतर तालुका पोलिसांनी धाव घेतली. सौरभसोबतचा मित्रही जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मृत सौरभच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परीवार आहे. किराणा व्यावसायीक गोपालदास मनवाणी यांचा तो चिरंजीव होय. गुरुवारी रात्री नऊ वाजता मृत सौरभवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.