अंजाळे गावातनून घराबाहेर लावलेली मोटरसायकल लांबवली


यावल (रविवार, 26 जुलै 2026) : यावल तालुक्यातील अंजाळे या गावातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरट्यांनी लांबवली. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ग्रामीण भागात दुचाकी चोरट्यांचा शिरकाव
अंजाळे, ता.यावल या गावात दयाराम काशीराम बारेला हे राहतात. त्यांनी घराबाहेर मोटरसायकल (क्रमांक एम.पी. 10 झेड. के. 7581) ही लावली असता कुणीतरी अज्ञात चोरट्याने संधी साधून मोटारसायकल चोरी केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रारंभी मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मोटारसायकल कुठेही मिळून आली नाही.

या प्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !