शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे शिक्षकांनाही पाच वर्षांपर्यंत असाधारण रजेचा अधिकार : प्र.ह.दलाल


भुसावळ (27 मार्च 2025) : जिल्ह्यातील अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघटनेचे काही नेते शिक्षकांना किरकोळ रजा, काही विशिष्ट कारणांसाठी मिळणारी विशेष रजा आणि अर्जित रजा याव्यतिरिक्त इतर कोणत्याच प्रकारची रजा देय नाही, असे सांगून शिक्षकांची मुख्याध्यापक व संस्थाचालक दिशाभूल करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ शिक्षक नेते व शिक्षण तज्ज्ञ प्र.ह.दलाल यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. शासकीय कर्मचार्‍यांना असाधारण रजा पाच वर्षांपर्यंत घेता येते, असेही त्यांनी कळवले आहे.

पाच वर्षांपर्यंत रजेचा अधिकार
दलाल यांनी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16 (13) याकडे लक्ष वेधले आहे शिक्षण कायद्यातच तरतूद असल्यामुळे त्यासाठी वेगळे परिपत्रक किंवा शासन आदेश यांची गरजच नाही. कायद्यातील तरतूद स्पष्टपणे अशी आहे की, ज्या बाबतीत नियमानुसार अन्य कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय नसेल अशा विशेष बाबतीत किंवा ज्या बाबतीत अन्य रजा उपलब्ध असूनही कर्मचार्‍याने असाधारण रजा मिळण्यासाठी लेखी अर्ज केला असेल तर त्या बाबतीत त्याला असाधारण रजा मंजूर करता येईल. स्थायी कर्मचार्‍यांच्या बाबतीत कोणत्याही एका वेळी असाधारण रजेचा कालावधी तीन वर्षांपेक्षा अधिक असणार नाही परंतु महाराष्ट्र शासन वित्त विभाग निर्णय क्रमांक अरजा/2402/25 सेवा मंत्रालय मुंबई 32 दिनांक 7 ऑक्टोबर 2003 ह्या शासन जीआर आदेशान्वये शासकीय कर्मचार्‍यांना असाधारण रजा पाच वर्षांपर्यंत घेता येते. शिक्षण संचालक यांचे पत्र क्रमांक अमाशा/34/ विअर / क/शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या 7 जानेवारी 2003 च्या आदेशान्वये शासकीय कर्मचार्‍यांना लागू असलेले पाच वर्षापर्यंतच्या असाधारण रजा घेण्याचा नियम शिक्षण विभागालाही लागू आहे याशिवाय क्षय कॅन्सर पक्षाघात इत्यादी काही गंभीर आजारांसाठी सुद्धा एक ते तीन वर्षांपर्यंत पगारासह विशेष रजा मंजूर करता येते . शक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी या तरतुदीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही प्र.ह.दलाल यांनी केले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !