एनएसएसमुळे विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक जबाबदारीची प्रेरणा : डॉ.राजेंद्र नाडेकर
भुसावळ (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : एन.एस.एस.मुळे व्यक्तिमत्व विकास होतो, समाजात समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरीत करते. एक चांगले राष्ट्र घडविण्यास एनएसएस स्वयंसेविकांचा खूप मोठा सहभाग असतो, असे विचार
कवयित्री बहिणीबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे भुसावळ विभागीय समन्वयक डॉ.राजेंद्र नाडेकर यांनी येथे व्यक्त केले.

शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात एन.एस.एस. विभागातर्फे प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थिनींचा ओरिएंटेशन वर्ग आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून डॉ.नाडेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वयंसेविकांना एन.एस.एस. ची माहिती, महत्व व त्याची उपयोगिता याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य तथा एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ.मीना चौधरी यांनी तर सूत्रसंचालन गुंजन बडगुजर व आभार मानसी महाजनने मानले. ओरिएंटेशन वर्गानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.निलेश गुरुचल, प्रा.रुकसाना शेख, प्रा.गिरीश सरोदे, प्रा.उज्वला महाजन, प्रा.रविकांत वासनिक व माजी स्वयंसेविकांनी परिश्रम घेतले.