भुसावळात जैन गुरुमाईंच्या सानिध्यात सुराणा साधना भवनात 9 दिवसीय अन्न-पाण्याविना उपवास : उद्या पार पडणार पच्चरखाण सांगता सोहळा


भुसावळ (बुधवार, 5 ऑगस्ट 2026) : शहरातील जैन समाजात सध्या मोठ्या उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण आहे. प.पू.गुरुमाईंच्या पावन सानिध्यात जैन गुरुमाई सम्यक दर्शनाजी म.सा.आदी ठाणे तीन यांचा चातुर्मास सुराणा साधना भवनात अत्यंत उत्साहात सुरू आहे. या चातुर्मासादरम्यान शेकडो जैन बंधू-भगिनी प्रवचन आणि दर्शनाचा लाभ घेत असून, विविध प्रकारची तपस्या केली जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भुसावळ येथील जैन श्रीसंघाचे सभापती व्यापारी जळगाव जनता बँकेचे संचालक तसेच अनेक सामाजिक व राजकीय संस्थांचे संचालक आणि अध्यक्ष जयंतीलाल शांतीलाल सुराणा यांनी गुरुमाईंच्या सानिध्यात अत्यंत कठीण अशी 9 दिवसीय बिना अन्न पाण्याची (निर्जला) तपस्या पूर्ण केली आहे.

या खडतर उपवासाची सांगता (पारणा) गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 10 या वेळेत भुसावळ येथील सुराणा साधना भवनात होत आहे. या निमित्ताने आयोजित पच्चरखाणच्या विशेष धार्मिक कार्यक्रमाला आणि जयंतीलाल सुराणा यांच्या अनुमोदनेसाठी सर्व जैन धर्मियांनी व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल जैन संघातर्फे जे.बी.कोटेचा, नितीन सुराणा, महेंद्र सुराणा, राजेश सुराणा, अशोक सुराणा यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !