दहिगावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला


Child marriage of 16-year-old minor girl prevented in Dahigaon यावल (28 मार्च 2028) : यावल तालुक्यातील दहिगाव येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका 19 वर्षीय तरुणांसोबत बालविवाह लावला जात असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने दहिगावात येत बालविवाह रोखला. ही कारवाई गुरुवार, 27 मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली.

सतर्कतेने रोखला बालविवाह
अल्पवयीन मुलीस कायदेशीर कार्यवाही पूर्ण करीत बाल सरंक्षण समितीकडे
सोपवण्यात आले. दहिगावातील पटेल मोहल्यामध्ये ज्ञानेश्वर गजानन पाटील (19) या तरुणासोबत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावला जात असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने दहिगाव गाठत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा होत असलेला बालविवाह रोखला. अल्पवयीन मुलगी आणी तरुण व त्याच्या कुटुंबास यावल पोलीस ठाण्यात आणण्यात आले.





अल्पवयीन मुलगी ही नागपूर जिल्ह्याची असून मुलीच्या विवाह होत असतांना तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील कोणीच येथे उपस्थित नसल्याचे बाल विकास प्रकल्पाधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगितले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत या अल्पवयीन मुलीस जळगाव येथील बाल सरंक्षण समितीकडे सोपवण्यात आले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !