कर्नाटकच्या ट्रक चालकाला चाळीसगावात लूटले : दोघे जाळ्यात

Truck driver from Karnataka robbed in Chalisgaon : Two in the net चाळीसगाव (12 मे 2025) : कर्नाटक राज्यातील ट्रक चालकाला मारहाण करीत लूटण्यात आल्याची घटना चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली.
काय घडले चाळीसगावात
चांद पाशा फखीर पाशा सय्यद (रा.याकुबपुरा, ता. बसवाकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) यांच्या तक्रारीनुसार, रविवार, 11 मे रोजी मध्यरात्री कॅप्टन कॉर्नर भागात सहा संशयीत आले व त्यांनी ट्रक चालकाला मारहाण करीत धमकावून त्यांच्याकडील 15 हजारांची रोकड हिसकावून पळ काढला. चालकाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन आरोपींना अटक
शहर पोलिसांनी संशयित कन्हैया जितेंद्र देठे (22, रा.नारायणवाडी, चाळीसगाव) व अभय सुभाष राखुंडे (19, रा.इंदिरानगर झोपडपट्टी, चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात दोन अल्पवयीन असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून अन्य दोघांपैकी एक जळगावचा व दुसरा धुळ्यातील रहिवासी असल्याने त्यांचा कसून शोध सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई चाळीसगाव पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज पाटील, अजय पाटील, नितीश पाटील, आगोणे, गोपाळ पाटील यांच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.
