भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचा निकाल 98.38 टक्के
आर्या नंदगवळी प्रथम तर वृषाली चौधरी द्वितीय

K. Narkhede Vidyalaya in Bhusawal scores 98.38 percent भुसावळ (13 मे 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 98.38 टक्के लागला.
प्रथम आर्या प्रणय नंदगवळी (95.40 टक्के), द्वितीय- वृषाली संदीप चौधरी (94.60) तर डिंपल रवींद्र बहाळे (94.20) तृतीय आली.
विद्यार्थ्यांमधून प्रथम शुभ गणेश बेलसरे (93.40) प्रथम तर विद्यार्थिनींमधून प्रथम आर्या प्रणय नंदगवळी (95.40) तर मागासवर्गीयांमधुन प्रथम शुभ गणेश बेलसरे (93.40) तर विद्यार्थिनीमधून आर्या प्रणय नंदगवळी (95.40) आली.
विद्यालयातून मार्च 2025 परीक्षेस एकूण 247 विद्यार्थी प्रविष्ठ होते. त्यापैकी विद्यालयातील एकूण 18 विद्यार्थ्यांनी शेकडा 90 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळवत यश मिळवले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद एन. नारखेडे, उपाध्यक्ष डॉ.किशोर एन.नारखेडे, चेअरमन श्रीनिवास एन. नारखेडे, सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, सदस्य डॉ.संजीव एन.नारखेडे, भाग्येश एम. नारखेडे, राज किशोर नारखेडे, ऑ.जॉ.सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे, के.एन.सी.टी.आय. विभाग प्रमुख बी.ए.पाटील, तसेच इतर संस्था सदस्य व विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका एस.ए.अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
