भुसावळातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयमचा शंभर टक्के निकाल


100% result of N.K. Narkhede English Medium in Bhusawal भुसावळ (13 मे 2025)  : शहरातील एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुलने यशाची परंपरा यंदादेखील कायम राखली. दहावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला. मंगळवार, 13 मे रोजी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेत स्थळावर निकाल जाहीर होताच यशवंतांनी जल्लोष केला.

समृद्धी जावळे प्रथम
विद्यालयात समृध्दी तुषार जावळे ही विद्यार्थिनी 95.60 टक्के गुण मिळवून प्रथम तर तोषवी अमित फेगडे ही विद्यार्थिनी 94.20 टक्के गुण मिळवून व्दितीय आली. टीना भास्कर तडे ही विद्यार्थिनी 93.20 टक्के गुण मिळवून तृतीय आली.

एस.सी.प्रर्वगातून निधी राजेश गनवीर या विद्यार्थीनीने मुलींमधुन 88.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक येण्याचा मान मिळवला तर 90 टक्क्यांहून अधिक गुण आठ विद्यार्थ्यांनी मिळवले.

गुणवंतांवर शुभेच्छांचा वर्षाव
दहावी परीक्षेत प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद एन.नारखेडे यांनी कौतुक केले. संस्थेचे सेंक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्थेचे सभासद विकास पाचपांडे शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोल्हे, पर्यवेक्षिका राखी बढे या सर्व मान्यवरांच्या हस्ते यशवंतांचा गौरव करण्यात आला. प्रसंगी सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी गुणवंतांना शुभेच्छा दिल्या.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !