जळगाव जिल्ह्यात भाजपाने राखले सामाजिक संतुलन : पूर्व विभाग जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर तर पश्चिमसाठी डॉ.राध्येश्याम चौधरींची निवड

BJP maintains social balance in Jalgaon district : Chandrakant Baviskar elected as East Division District President and Dr. Radhyeshyam Chaudhary elected as West Division District President जळगाव (13 मे 2025) : भारतीय जनता पार्टीने सामाजिक संतुलन राखत जळगाव पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्षांची निवड केली. यावेळी जळगाव महानगर अध्यक्षांचीदेखील निवड जाहीर करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार ? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते.

भाजपा पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी जामनेर येथील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांची तर पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी माजी लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी यांची निवड करण्यात आली.
जळगाव महानगर अध्यक्षपदी पुन्हा एकदा दीपक सूर्यवंशी यांना संधी मिळाली आहे.
भारतीय जनता पक्षाने दोन मराठा व एक गुजर पदाधिकार्यांवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून सामाजिक संतुलन साधण्याचा प्रयत्न केलेला आहे.
डॉ.राधेश्याम चौधरी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना जिल्हाध्यक्षपद मिळवून देण्यास कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. चंद्रकांत बाविस्कर यांनी जामनेर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली असून ते गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. यामुळे त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दीपक सूर्यवंशी यांनी याआधी देखील महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळलेली असल्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा महानगराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
