साकेगावातील श्री स्वामीनारायण गुरुकुलचा निकाल 100 टक्के

The results of Shri Swaminarayan Gurukul in Sakegaon are 100 percent. भुसावळ (14 मे 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलच्या दहावी मराठी व इंग्रजी दोन्ही माध्यमाच्या शाळांनी आपली शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम ठेवली. इंग्रजी माध्यमातून जिष्णू कुंदन चौधरी हा 97.0 टक्के गुण मिळवून प्रथम आला तर सोहम संजय झोपे 94.40 टक्के गुण घेऊन द्वितीय तर खुशाल प्रमोद पाटील हा 93.40 टक्के गुणांसह तृतीय आला.
मराठी माध्यमातून जयेश प्रल्हाद पाटील हा 92.8 टक्के गुण मिळवून प्रथम आला तर कुणाल संजीव पाटील 92.40 टक्के गुण मिळवत द्वितीय तर मोहनीश सुधाकर पाटील हा 91.60 टक्के गुण मिळवून तृतीय आला.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प.पू.के.के. शास्त्री, गोपाळ भगत, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका उज्वला धांडे, मराठी माध्यमाच्या मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी यांनी अभिनंदन व कौतुक केले.
