भुसावळातील बियाणी स्कूलने राखली यशाची परंपरा : दहावीचा निकाल शंभर टक्के

Biyani School in Bhusawal maintains tradition of success : 100% result in 10th class भुसावळ (14 मे 2025) : शहरातील राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी माध्यमिक विद्यालय (इंग्रजी माध्यम) तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
बियाणी माध्यमिक विद्यालय ( इंग्रजी माध्यम) तून आर्या विनोद तायडे (94.60) प्रथम तर सिद्धीका प्रदीप गौड (93) द्वितीय तसेच कोमल सुधीर तायडे (92.20) व हिमांश मयूर चौधरी (92.20) तृतीय आला.

बियाणी माध्यमिक विद्यालय (मराठी माध्यम) तून प्रथम भैरवी शांताराम देवरे (91.60), द्वितीय हितेश किरण पवार (91.20),
तृतीय तपस्या बलदेव सिंग मेहेरे (90) आली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, प्रिन्सिपल रुद्रसेन गंठिया यांनी कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
