भुसावळातील म्युनिसीपल हायस्कूलचा दहावीचा निकाल 74 टक्के

Municipal High School in Bhusawal’s 10th class result is 74 percent भुसावळ (14 मे 2025) : नगरपरिषद संचालित म्युनिसिपल हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल 74 टक्के लागला. 87 पैकी 65 विद्यार्थी उर्त्ती झाले.
शाळेतून प्रथमेश सुभाष मोरे (75.6 टक्के) गुण मिळवून प्रथम तर
प्रणित योगेश बाविस्कर हा (74.8) द्वितीय तसेच शुभम दीपक समशेर (72.6 टक्के) तृतीय आला.

सात विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांहून अधिक गुण मिळाले तर 25 विद्यार्थ्यांना 61 टक्क्यांवर गुण मिळाले.
यशस्वी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, मुख्याध्यापक एस.जी.मेढे, सेवा ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, क्रीडा शिक्षक डॉ.प्रदीप साखरे, एस.टी.चौधरी, डी.के.भंगाळे, एन.एच.राठोड, संध्या धांडे, ज्योती शिरपुरे, रेखा सोनवणे, नाना पाटील, एम. एच. किरंगे, टेक्नो शिक्षक एन.जी.बोराडे. ज्येष्ठ लिपिक प्रवीण चौधरी, पुनम देवकर, ग्रंथपाल अरुण नेटके, लक्ष्मण पवार, के.डी.चौधरी, मंदा मोरे, राजू बागुल, मनोज चौधरी आदींनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
