फैजपूर पोलिसांची कामगिरी : कत्तलीपूर्वीच तीन गुरांची सुटका


Faizpur Police’s performance: Three cattle rescued before slaughter फैजपूर (15 मे 2025) : फैजपूर पोलिसांनी कत्तलीसाठी जाणार्‍या तीन गोवंशाची सुटका करीत मारूळ, ता.यावल येथील चालक जहांगीर चांदखॉ तडवी (46) विरोधात गुन्हा दाखल केला.

चालकासह वाहन ताब्यात
फैजपूर शहरात यावल रोडवरील हॉटेल अन्नपुर्णा येथे रोडवर सार्वजनीक जागी संशयीत तडवी हा छोटा हत्ती वाहन (एम.एच.02 वाय.6799) नेत असताना त्यास नागरिकांच्या मदतीने अडवल्यानंतर वाहनात तीन गोवंश जातीचे गुरे आढळल्याने व गुरे वाहतुकीबाबत परवाना नसल्याने वाहनासह गुरे ताब्यात घेण्यात आली. 35 हजार रुपये किंमतीची तीन गुरे तसेच 80 हजार रुपये किंमतीचे वाहन पोलिसांनी जप्त करून वाहन चालका व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक मैनुददीन सैय्यद, पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे, एएसआय देविदास सुरदास, हवालदार ज्ञानेश्वर चौधरी, हवालदार रवींद्र मोरे, हवालदार अनिल पाटील, नाईक विशाल मोहे, कॉन्स्टेबल राहुल चौधरी, कॉन्स्टेबल विजय परदेशी यांनी ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !