रावेरात गोमांस विक्री : दाम्पत्याविरोधात गुन्हा


Selling beef in Rawer : Crime against couple रावेर (15 मे 2025) : शहरातील कुरेशी मोहल्ला भागात गोमांस विक्री करताना दाम्पत्य आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शुक्रवारी पहाटे रसलपूर येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून दीड लाख रुपये किमतीचे गोमांस, कुर्‍हाड व सुरे जप्त केले होते. याप्रकरणी सादिक शेख नुरा, वसीम कय्युम कुरेशी, शेख शकील शेख कलीम व सलीम उस्मान कुरेशी हे चौघे गोमांस विक्री करताना आढळल्याने त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईला पाच दिवस उलटत नाही तोच गोवंश तस्करांनी पुन्हा डोके वर काढले.

रावेरात गोमांस विक्री
शहरातील कुरेशी मोहल्ला येथे आज अवैधरीत्या गोमांस विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, महेश मोगरे,विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, सचिन घुगे यांच्या गुन्हे शोध पथकाने कारवाई करीत नजमाबी मोहमद हुसेन भतीयारा (37) व पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा (55) यांना जनावरांची कत्तल करताना पकडले. याकामी मदत करणारा एक संशयीत पसार झाला.

दाम्पत्याविरोधात पोलीस कर्मचारी सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतांकडील 40 हजार रुपये किंमतीचे गोमांस, कुर्‍हाड व सुरे पोलिसांनी जप्त करीत गोमांसाची जमिनीत विल्हेवाट लावली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !