विद्यार्थ्यांनो लक्ष द्या : उद्यापासून शाळांमध्ये मिळणार बारावीचे गुणपत्रक


Attention students : Class 12th mark sheets will be available in schools from tomorrow जळगाव (15 मे 2025) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवार, 5 मे 2025 रोजी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला.

या परीक्षेच्या गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्रे व तपशीलवार गुणपत्रकांचे शालेय अभिलेख शुक्रवार, 16 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना वितरित करण्यात येणार आहेत.

त्यानंतर त्याच दिवशी दुपारी तीन वाजता संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका वितरित केल्या जातील.

या अनुषंगाने सर्व प्राचार्य, विद्यार्थी व पालक यांनी योग्य ती नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !