अमळनेरात मालगाडी घसरली : सुरत लाईनवरील वाहतूक ठप्प्


Goods train derails in Amalnerat : Traffic on Surat line disrupted अमळनेर (15 मे 2025) : अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ मालगाडी घसरल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडल्यानंतर अप-डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, दहा गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून तीन गाड्या रद्द झाल्याचे समजते.

काय घडले नेमके
भुसावळकडून नंदुरबारकडे कोळसा घेवून जाणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजता घडली. या घटनेत रेल्वेचे लोको पायलट आणि गार्ड पूर्णपणे सुरक्षित आहेत मात्र, मालगाडीचे काही डब्बे रुळावरून खाली उतरल्याने आजूबाजूचे रेल्वे ट्रॅकही खराब झाले आहेत. यामुळे सुरत-भुसावळ या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

अमळनेर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावरच ही घटना घडल्यामुळे रेल्वे प्रशासनातील अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.

दहा गाड्यांचे बदलले मार्ग
सूत्रांच्या माहितीनुसार, अप-डाऊन मार्गावरील दहा रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून लवकरच अधिकृतरित्या माहिती दिली जाणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !